मंगळवार, १२ मे, २०१५

साडेसाती भाग - 3

 
  साडेसाती भाग - 3
साडेसातीचे उपाय :
1.    आपल्या कुलदेवतांची उपासना नित्यनेमाने रोज करण्या इतका चांगला उपाय कोणताही नसेल. ते एक सं‍रक्षक कवच असते.  दररोज गणेश स्रोत्राचे वाचन करून गणेश दर्शन घ्यावे शनिवार उपवास करावा व शनि चालीसा वाचणे.
2.    शनि ग्रहाची पूजा
3.    शनि ग्रहाचा जप करावा
4.    शनि यंत्राची पूजा करावी
5.    रूद्राक्ष धारण करावा
6.    महामृत्युंजय या मंत्राचा जप करावा.
7.    शानिवार उपवास करावा व शनि चालीसा वाचणे.
8.    हनुमान चालीसा वाचावी.
9.    अध्यात्मीक प्रगती गुरूमंत्राचे मनन करावे.
10.    वाईट प्रवृतींपासून दुर रहावे.
11.    शनिवारी उडीद, तेल, तीळाचे तेल व रूईच्या पानांचा हार शनिमहाराजांना घालावा.
12.    आपल्या इष्टदेवतेचा जप रोज करणे व जप करताना आकाश मुद्रा करणे लाभप्रद ठरते.
13.    स्वकष्टार्जीत धनातून "गरजूंना" अन्नधान्य देणे लाभप्रद ठरते,
14.    हनुमंताचे दर्शन घेणे , समर्थरामदासकृत मारुतीस्तोत्र म्हणावे,
15.    सुमिरी पवनसुत पावन नामू। अपने बस करि राखे रामू॥ हा मंत्र जप करणे,
16.    हनुमानचालीसा, बजरंगबाण किंवा सुंदरकांड ही हनुमंताच्या पराक्रमाचे गुणवर्णन करणारी स्तोत्रे म्हणावीत.
17.    हनुंमताची उपासना केल्याने मनोबल प्राप्त होते, हे उपाय करुन आयुष्यात सौख्याचा अनुभव घ्या.
शनीची साडेसाती असतांना तुम्ही खालील नियम पाळले तर याचा त्रास होत नाही.
1.    नीतीने वागावे, म्हणजे त्रास कमी होतो. मांस व मद्यपान करू नये
2.    कोणालाही खोटी आश्वासने देण्याचे टाळा. वाईट प्रवृतींपासून दुर रहावे.
3.    उद्या होणार्‍या कामावर आज कोणालाही शब्द देण्याचे टाळा. जेव्हा प्रत्यक्ष हातात काही येईल तेव्हाच दुसर्‍याला शब्द द्या.
4.    तुम्ही जे कार्य योजीले आहे त्या विषयी, त्या संबंधित व्यक्तींशीच चर्चा करा. इतरांशी त्याविषयी काहीही बोलायचे टाळा.
5.    खोटे बोलायचे टाळा व इतरांच्या स्वत:संबंधीच्या अपेक्षा उंचावु नका.
6.    वरील बर्‍याच गोष्टी रोजच्या जीवनात आचरनात आणणे कठीण असल्यामुळे, शक्यतो जास्त बोलण्याचेच टाळा.
वरील नियमांचे पालन केल्यास त्रास होणार नाही.
साडेसाती एक इष्टापती -
पायरी न ओळखता अविचाराने वागून बेभान वागणाऱ्या व्यक्तींना वठणीवर आणण्यासाठी साडेसाती हा रामबाण उपाय होय. आत्मपरीक्षण करण्याची समज नसलेल्यांना सुधारण्याचे, माणुसकीत आणण्याचे कार्य श्री शनिदेव करतो ते फक्त साडेसातीच्या माध्यमातून, म्हणून उच्च विचार केला असता साडेसाती ही एक इष्टापतीच होय. साडेसातीच्या काळात दिसून येणारा अनुभव म्हणजे स्वताच्या बाबतीत सर्वच प्रतिकूल दिसणे किंवा असणे . उदा :- कुठल्याही कामात अपयश , चूक नसताना त्रास भोगावा लागणे, दोस्त मंडळीकडून विश्वासघात, आर्थिक नुकसान, कौंटुबिक कलह वाढणे, मनाविरुद्धच्या घटना भाऊबंदकीचे प्रसंग उत्पन्न होणे, बुडीत जाणे , कोर्ट कचेऱ्यांचे सापडणे, चिवट दुखणी सुरु होणे, मानहानी वा मानसिक अत्याचार सहन करावे लागणे हे प्रकार अनुभवास येतात. साडेसाती हा भोग आहे, तो भोगूनच संपविला पाहिजे. यावर योग्य व जालीम उपाय करून परिणामांची तीव्रता कमी करता येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा