मंगळवार, २४ मार्च, २०१५

साप्ताहिक राशिभविष्य

साप्ताहिक राशिभविष्य : 12ते 18 एप्रिल 2015

मेष - सामंजस्याने वागा

आठवड्याच्या पहिल्या ३ दिवसांतच रविचा मंगळ-बुधाबरोबर राशिस्थानी प्रवेश होत असल्याने कामकाजाचा उत्साह वाढीला लागेल. बौद्धिक क्षेत्रात उत्तम वाव मिळाल्याने व्यापार उद्योगात प्रगती करता येईल. द्वितीयात शुक्राचे आगमन झाल्याने आर्थिक बाजू चांगल्या प्रकारे सावरता येईल. मात्र स्पष्टवक्तेपणा बाजूला ठेवून, सामंजस्याने वागणे अधिक उचित ठरेल. जुने काही येणे वसूल होण्याची शक्यता राहील. घरगुती वातावरण चांगले राहील. छोटे प्रवास संभवतात. आपले दैनिक व्यवहार चालू राहतील. आठवड्याचे पहिले २/३ दिवस सावध राहा. प्रकृती जपा.

वृषभ - सतर्कता ठेवा

रवि आठवड्याच्या प्रथम २/३ दिवस शुभ असल्याने सरकार दप्तरची कामे त्या अवधीत करून घ्यावीत. व्ययस्थानी मंगळ-बुध आणि लवकरच येणारा रवि यांची प्रतिकूलता राहणार असल्याने यशाचा मार्ग सहज-सोपा राहणार नाही. खर्चाचे प्रमाण वाढेल. आर्थिक व्यवहारात सतर्कता ठेवा. वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारा. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळविता येईल. आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. साहसी कृत्ये टाळा. सत्याची कास धरा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका.

मिथु‌न - आनंदमय आठवडा

चतुर्थातील राहू कौटुंबिक गोष्टींचा काही त्रास देणारा असतो तेव्हा जपा. गुरूकृपा, लाभस्थानी मंगळ-बुध, आणि लवकरच येणारा रवि यांच्या सहाय्याने आपण आपले ‌इष्ट मित्रांमध्ये एक वेगळी प्रतिमा तयार कराल. बौद्धिक क्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. व्यापार व उद्योगाला प्रोत्साहन मिळेल. नव्या कल्पना, नव्या गोष्टींचा स्वीकार करता येईल. थोरामोठ्यांचा सहवास लाभेल. अचानक प्रवासाचे योग संभवतात. छानछोकीच्या गोष्टी, खरेदीचे बेत आखाल. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. प्रलोभने टाळा. आनंदमय आठवडा जाईल.

कर्क - वर्चस्व वाढेल

गुरू राशिस्थानी, शनी, मंगळ-बुध-रवि सहयोग, लाभस्थानी शुक्र अशा छान ग्रहस्थितीचा लाभ आपणास मिळाल्याने आपले कार्यक्षेत्रातील वर्चस्व वाढेल. नोकरी, व्यवसाय, व्यापार, कला, राजकारण अशा विविध क्षेत्रांचा यात समावेश होईल. दूरच्या प्रवासाचे स्वप्न साकार करता येईल. नोकरीत सुलभता जाणवेल. आर्थिक बाजू सावरता येईल. राशिस्थानीचा गुरू आपल्या कार्यास मोलाची मदत करील. कामकाजात एक प्रकारचा प्रभाव राहील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती साधता येईल.

सिंह - सावधगिरी ठेवा

चतुर्थात शनी, व्ययस्थानी गुरू आणि अष्टमात असणारा रवि ३ दिवसांत भाग्यात प्रवेश करणार असल्याने रविबाबत चिंता करू नये. गुरूची नाराजी असल्याने प्रत्येक कार्यात प्रयत्नांची जोड मात्र द्यावी लागणार आहे. सामाजिक क्षेत्रात चमकण्याची संधी मिळेल. व्यापार, उद्योगात प्रगती साधता येईल. राजकीय क्षेत्रातील आपले वर्चस्व राखू शकाल. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्या. महत्त्वाच्या कामी सावधगिरी बाळगा. प्रवासाचे योग येतील. नव्या कल्पना, नव्या विचारांना योग्य वेळी त्याचा उपयोग करून घ्या. नवे परिचय लाभदायक ठरतील. प्रकृतीची पथ्ये पाळा.

कन्या - साहसी कृत्ये टाळा

अष्टमात मंगळ-बुध आणि लवकरच होणारे रविचे आगमन यांच्या प्रतिकूलतेने अडचणी, अडथळे येणार आहेत, त्या दृष्टीने आपली खबरदारी घ्यावी लागणार आहे. भाग्यातील शुक्र आपल्या आर्थिक व व्यावहारिक स्थिती सुधारण्यास मोलाची मदत करील. प्रवास कराल. कलाक्षेत्राला चालना मिळेल. वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्याचे धोरण स्वीकारा. साहस, स्पर्धा या गोष्टींपासून दूर राहा. प्रवासात सावध राहा. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. गृहसौख्य चांगले मिळेल. काही चांगल्या गोष्टींचे संकेत मिळतील.

तूळ - सामोपचाराचा मार्ग स्वीकारा

शनी साडेसातीचा काळ, त्यात बारावा राहू, अष्टमात शुक्र अशा ग्रहस्थितीत अडथळ्यातून मार्ग काढावा लागतो. या काळात मानसिक दडपणेही असू शकतात. शनी उपासना आपणास मानसिक स्थिरता देऊ शकेल. नको त्या प्रलोभनांना बळी पडू नका. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. प्रकृतीची पथ्ये कटाक्षाने पाळा. कायदा व नियमांचे पालन करा. राजकीय क्षेत्रात आपला वचक राहील. सामोपचाराच्या मार्गाने प्रश्न सोडवा.

वृश्चिक - दिलासा मिळेल

रवि, गुरू, राहू यांच्या भक्कम आधाराने आपणास मोठा आधार लाभणार आहे. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळणार आहे. प्रवास कराल. भाग्यातील गुरू आपल्या अडचणीतून मार्ग काढण्यास सहकार्य करील. रवि-बुध-मंगळ षष्ठात असल्याने प्रकृतीच्या बाबत अधिक दक्ष राहा. पथ्ये पाळा. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. साडेसाती असल्याने शनी उपासना सुरूच ठेवा. आपली प्रतिष्ठा शाबूत राहील. आपल्या हितशत्रूंना पुढे सरकता येणार नाही. परिस्थितीचा मागोवा घेतल्यास योग्य मार्ग मिळू शकेल. ग्रहमानाचा काहीसा दिलासा मिळेल.

धनू - दैनिक व्यवहार, उपक्रम सुरू ठेवाल

पंचमात मंगळ-बुध आणि लवकरच येणारा रवि, दशमात राहू अशी एकूण ग्रहस्थिती असल्याने आपण आपले दैनिक व्यवहार व उपक्रम सुरू ठेवू शकता. बौद्धिक क्षेत्राला चांगले प्रोत्साहन मिळेल. दशमातील राहू व्यवसाय, उद्योग यांना चांगले प्रोत्साहन ‌देऊन आपली शान शाबूत ठेवता येईल. आपल्यातील कर्तृत्व आणि धाडसीपणा आपल्या कार्याला उत्तेजन देईल. राजकीय क्षेत्रात आपले वर्चस्व राहील. उद्योग व्यवसायात प्रगती करता येईल. लेखकवर्गाला हा काळ उत्तम राहील. शनी उपासना सुरूच ठेवा. कायदा व नियमांचे पालन करा.

मकर - प्रगतीत पुढे सरकाल

चतुर्थात मंगळ-रवि-बुध यांची नाराजी असल्याने अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे. घरगुती वादावादीचे प्रसंग, प्रकृतीच्या तक्रारी यांचा समावेश होऊ शकेल. मात्र पंचमात शुक्र, सप्तमात गुरू, भाग्यात राहू, लाभस्थानी शनी अशी ग्रहांची साथ मिळाल्याने आपल्या कार्यक्षेत्रात आपण पुढे सरकू शकाल. कला, साहित्य, विज्ञान अशा क्षेत्रांत आपण प्रगती करू शकाल. प्रवासाचे योग येतील. विद्यार्थ्यांकडून अध्ययनात यशाची अपेक्षा करू शकाल. वादविवादापासून दूर राहा. प्रकृतीची पथ्ये पाळा.

कुंभ - चांगल्या घटना घडतील

पराक्रमी मंगळ-बुध व येणारा रवि, दशमात शनी यांची अनुकूलता लाभल्याने काही चांगल्या घटनांचा अनुभव आपणास येऊ शकेल, पण षष्ठात गुरू व अष्टमात राहू यांच्या प्रतिकूलतेने बऱ्याचदा कार्यात आळशीपणा, गडबड उडण्याची शक्यता असते तेव्हा विचारपूर्वक निर्णय घ्या व कृती करणे हितकारक ठरणार आहे. कला, राजकारण, व्यापार, नोकरी या क्षेत्रांत यशदायी घटनांचा अनुभव येऊ शकतो. चतुर्थातील शुक्र कौटुंबिक वातावरण प्रसन्न ठेवील. अपेक्षितांकडून सहकार्य मिळेल. प्रकृतीस्वास्थ्य मात्र जपा.

मीन - आगेकूच कराल

द्वितीयात मंगळ-बुध आणि लवकरच येणारा रवि, पराक्रमी शुक्र, पंचमात गुरू, सप्तमात राहू, भाग्यात शनी अशी छान ग्रहांची बैठक आपल्या राशीस लाभल्याने विविध क्षेत्रांत आपली आगेकूच राहील. कला, व्यापार, शिक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रांचा यात समावेश करता येईल. मुलांकडून अध्ययनात अपेक्षित यश संपादन करता येईल. कृषी क्षेत्रात उत्तम यश मिळेल. फक्त बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा ज्यामुळे दुसऱ्यांची मने दुखावणार नाहीत. आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. कौटुंबिक जीवन आनंदमय राहील

गुरुवार, १९ मार्च, २०१५

भाग्य यश संपत्ती मिळवण्याकरीता दैवी उपासना..........

भाग्य यश संपत्ती मिळवण्याकरीता दैवी उपासना.......... 
जन्मराशी-भाग्यरत्न-देवता साठी प्रतिमा परिणाम जन्मराशी-भाग्यरत्न-देवता साठी प्रतिमा परिणाम

जन्मराशी-भाग्यरत्न-देवता

Mesh rashi bhavishya
मेष : ज्याची रास मेष आहे त्यांनी कुलदेवतेची व गणपतीची उपासना करावी. भाग्यरत्न पोवळे रत्न तांब्यात वापरावे. शुभवार : मंगळवार.
Vrishabha rashi bhavishya
वृषभ : वृषभ राशिवाल्यांनी देवीची उपासना करावी. मंगळवार, शुक्रवार किंवा अष्टमीचा उपवास करावा. भाग्यरत्न हिरा सोन्यात वापरणे. शुभवार : शुक्रवार
Mithun rashi bhavishya
मिथून : भाग्य उजळण्यासाठी भगवान, श्रीकृष्णाची व विष्णूची उपासना करावी बुधवार व्रत करावे. भाग्यरत्न पाचू चांदीत. शुभवार बुधवार
Karka rashi bhavishya
कर्क : या राशी वाल्यांनी भगवान शंकराची उपासना करावी. दूध व तांदूळ तसेच चांदी दान करावी.
Simha rashi bhavishya
सिंह : भगवान सुर्यनारायणाची उपासना, विष्णू पूजा. भाग्यरत्न माणिक सोन्यात. शुभवार रविवार
Kanya rashi bhavishya
कन्या : या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूची आराधना करावी. भाग्यरत्न पाचू चांदीत. शुभवार बुधवार
Tula rashi bhavishya
तूळ : या लोकांनी जगदंबेची उपासना करावी. भाग्यरत्न हिरा शुभवार शुक्रवार
Vrishchika rashi bhavishya
वृश्चिक : या राशीवाल्यांनी भाग्यप्राप्तीकरीता व संकट निवारण्याकरीता सोळा सोमवार व्रत करावा. भाग्यरत्न पोवळ शुभवार मंगळवार.
Dhanu rashi bhavishya
धनु : या राशीच्या लोकांनी भगवान दत्तात्रेयाची उपासना कायम करावी. शुभवार गुरूवार, शुभरंग पिवळा, गुलाबी.
Makara rashi bhavishya
मकर : या राशीच्या लोकांनी शनिवार उपवास करावा. भाग्यरत्न निलम शुभवार शनिवार
Kumbha rashi bhavishya
कुंभ : या राशीच्या लोकांनी मारूतीची उपासना करावी. भाग्यरत्न निलम शुभवार शनिवार
Meena rashi bhavishya
मीन : या राशीवाल्यांनी भगवान दत्तात्रेयाची उपासना करावी. भाग्यरत्न पिवळा पुष्कराज सोन्यात शुभवार गुरूवार

बुधवार, १८ मार्च, २०१५

वार्षिक राशी भविष्य 2015

वार्षिक राशी भविष्य 2015

वार्षिक राशी भविष्य २०१५ साठी प्रतिमा परिणाम

मेष राशी भविष्य 2015

मेष राशी भविष्य 2015मेष राशीच्या व्यक्तींवर त्यांच्या स्वामीकडून, गुरूकडून कृपादृष्टीचा वर्षाव होणार आहे. तुमच्या नवव्या घराचा स्वामी (भाग्येश) तुमच्या चौथ्या आणि पाचव्या घरात असणार आहे. त्यामुळे 2015 सालातील पहिले सहा महिने कौंटुबिक आयुष्य सुखाचे राहील. तुम्ही परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. नवीन कार किंवा घर घ्यायची आहे? थोडेसे प्रयत्न करा आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. दुसऱ्या सहामाहीचा काळ प्रेम आणि लग्नासाठी एकदम योग्य आहे. ज्या दांपत्यांना अपत्य हवे आहे त्यांना या कालावधीत अपत्यप्राप्ती होईल. उद्योजक त्यांच्या कामाची व्याप्ती वाढवतील. तुम्ही एखाद्या नवीन योजनेसह नवे काम सुरू कराल. राशी भविष्य 2015 अनुसार तुम्हाला या काळात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक वृद्धीसाठी हा सुयोग्य काळ आहे. असे असले तरी आठव्या घरात असलेला शनि आणि सहाव्या घरात असलेला राहू यामुळे तुमच्या कौटुंबिक आणि आरोग्याच्या आघाडीवर तुम्ही स्वस्थ नसाल. तुम्ही याबाबत वेळोवेळी विचार करायला हवा. १२ व्या घरात असलेल्या केतू हेच दर्शवतो की, तुम्ही अडचणीत सापडून अतिउत्साहीपणे वागण्यापेक्षा दुसऱ्यांचा सल्ला घेणे चांगले. विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होईल.
मेष राशीच्या व्यक्तींनी 2015 सालात करण्याचे उपाय : चांदीची चौरसाकृती वस्तू स्वतःजवळ ठेवा.

वृषभ राशी भविष्य 2015

वृषभ राशी भविष्य 20152015 साला गुरू तुमच्यावर खुश असल्याचे दिसत आहे. गुरूच्या अनुकूलतेमुळे तुम्ही योग्य दिशेने प्रवास कराल आणि तुम्हाला यशही मिळेल. तुम्ही तुमचे कार्य व्यवस्थितपणे पार पाडालच, त्याचबरोबर तुम्हाला आदर, सन्मान मिळेल आणि तुमची प्रशंसा होईल. असे असले तरी वृषभ राशी भविष्य 2015 सालच्या कुंडलीनुसार शनि आठव्या घरात असल्यामुळे आर्थिक उत्पन्न मिळण्यात थोडे अडथळे निर्माण होतील. पण काळजी करू नका, सुखाचे मूल्य तुम्हाला जाणवावे यासाठीच आनंदाच्या क्षणांआधी तुम्हाला थोडे कष्ट सोसावे लागतील. त्याचबरोबर तुमच्या खासगी आयुष्यात अनुरूपतेचा अभाव निर्माण होईल. पण थोडेसे प्रयत्न करून तुम्ही सगळे अडथळे पार करत विजयी व्हाल. तुमच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचे झाले तर पाचव्या घरात असलेला राहू हेच दर्शवतो की, प्रेमात सत्यता आणि प्रामाणिकपणा हे घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडादाराशी प्रामाणिक राहाल, याची काळजी घ्या. संपत्तीविषयी सांगायचे झाल्यास, हे वर्ष अत्यंत उत्तम असणार आहे. फ्रिज, वॉशिंग मशीन यासारख्या उपकरणांवर थोडासा खर्च होईल. वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना 2015 सालात काही अनपेक्षित निकाल पाहावयास मिळतील.
वृषभ राशीच्या व्यक्तींनी 2015 सालात करण्याचे उपाय: काळ्या रंगाच्या गायीची सेवा करा.

मिथुन राशी भविष्य 2015

मिथुन राशी भविष्य 2015मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी 2015 सालात जादूचा पेटारा उघडणार आहे. हे वर्ष तुमच्यासाठी आश्चर्यकारक ठरणार आहे. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींसाठी काही करण्याची इच्छा मनात बाळगली असेल तर तुमच्या प्रयत्नांना निश्चितच यश मिळणार आहे. याला आपण सकारात्मक अर्थाने ‘सोन्याहून पिवळं’ असं म्हणू शकू. 2015 सालात तुम्हाला नाव, प्रसिद्धी, संपत्ती आणि एखाद्याची जे जे मिळविण्याची इच्छा असते, ते सर्व तुम्हाला मिळेल. या पेक्षा अजून तुमची मागणी काय असेल? 2015 सालच्या मिथुन राशीच्या भविष्यानुसार आरोग्यसुद्धा स्थिर राहील. तुम्ही खूप वर्षांपासून एखाद्या आजाराचा सामना करत असाल तर त्यात या वर्षी सुधारणा झालेली दिसून येईल. एकूणच या काळात तुम्हाला जॅकपॉट मिळेल. संपूर्ण वर्षच प्रेमाप्राप्तीसाठी अनुकूल आहे. तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल आणि तुम्हाला बदल हवा असेल तर काही अधिक चांगले मिळविण्यासाठी हा योग्य काळ आहे. त्यामुळे एखादी नवीन संधी चालून आली तर अजिबात सोडू नका. दुसरीकडे, व्यावसायिकांना थोडे अधिक कष्ट करावे लागतील, पण लक्षात ठेवा, कष्टांचे फळ हे चांगलेच असते. त्यामुळे 2015 सालच्या मिथुन राशीची कुंडली हेच सांगते की, कष्ट करण्यात अजिबात कचरू नका. विद्यार्थ्यांबाबत सांगायचे झाले तर त्यांना चांगले निकाल मिळतील.
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी 2015 सालात करावयाचा उपाय: लहान मुलींची सेवा करा.

कर्क राशी भविष्य 2015

कर्क राशी भविष्य 2015कर्क राशीच्या व्यक्तींसाठी 2015 हे वर्ष काही बाबतीत अत्यंत अनुकूल असणार आहे. तुमचे वय विवाहायोग्य झाले असले तर या वर्षी तुमचा लग्नयोग आहे. त्यामुळे तयार राहा! तुम्ही स्वतः लग्न कराल किंवा तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे लग्न होईल, त्यामुळे तुमचे घर हे लग्नघर असेल, हे निश्चित आहे. कर्क राशी भविष्य 2015 अनुसार प्रेमप्रकरणांमध्ये पिच्छा पुरववून काहीही साध्य होणार नाही. त्यामुळे संयमी आणि काळजीपूर्वक वागा. कामच्या बाबतीही 2015 साल हे उत्तम असेल. कामात बढती मिळण्याची शक्यता आहे. हा कालावधी तुमच्यासाठी अत्योत्तम असणार आहे, असे दिसते. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. पण हा प्रवास बहुधा निष्फळ ठरेल. पण एकूणच 2015 हे वर्ष कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आरामदायी असेल. तुमची आर्थिक बाजू या वर्षाय बळकट असली तरी आंधळेपणाने गुंतवणूक करणे योग्य राहणार नाही. शेवटी तुमच्यासाठी एक काळजीच कारण आहे. तुमच्या प्रकृतीमध्ये उतार-चढाव दिसून येतील. याचा अर्थ तुम्ही आजारी पडालच असे नाही. फक्त तुम्हाला थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांसाठीसुद्धा हे वर्ष शुभ असेल. वर्षातील ९० टक्के कालावधी कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल असेल.
कर्क राशींच्या व्यक्तींनी 2015 सालात करावयाचे उपाय: देवळात बदाम दान करा.

सिंह राशी भविष्य 2015

सिंह राशी भविष्य 2015सिंह राशीच्या 2015 सालच्या कुंडलीनुसार हे वर्ष संमिश्र असेल. गोंधळून जाऊ नका. काही काळ खूप चांगला असेल तर काही काळ थोडासा उतार-चढावांचा असेल. 2015 सालातील पहिल्या सहा महिन्यांमध्ये गुरू तुमच्या १२ व्या स्थानात आहे आणि शनि चौथ्या स्थानात आहे. त्यामुळे तुम्हाला थोड्या अडथळ्यांचा सामना करावा लागेल. पण वैतागून जाऊ नका, हा तुमच्या क्षमता तपासण्याचा काळ आहे. तुमच्या आप्तेष्टांच्या वागणुकीचा तुम्हाला त्रास होऊ शकेल, पण तुलनेने वर्षाचा उत्तरार्ध अधिक चांगला दिसून येत आहे. तुमचे त्रास या कालावधीत हळुहळू कमी होतील. असे असले तरी या काळात तुम्हाला कुणी काही बोलले तरी फार मनावर घेऊ नका. 2015 सालातील सिंह राशीच्या कुंडलीनुसार या काळात स्थिर आणि शांत राहिलेले योग्य राहील. तुमच्या अचूनक योजनेमुळे तुम्ही कठीण परिस्थितीवर मात कराल. तुम्ही अत्यंत बुद्धिमान आहात. एकूणच या वर्षी अनेक औत्सुक्यपूर्ण घटना घडतील. 2015 या वर्षाच पुरेपूर वापर करून घ्या आणि तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या क्षमतांचा शोध लागेल, ज्यामुळे तुम्ही कदाचित एक असामान्य व्यक्ती होऊ शकाल.
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी 2015 सालात करावयाचा उपाय: गायीला दूधभात खाऊ घाला.

कन्या राशी भविष्य 2015

कन्या राशी भविष्य 2015कन्या राशीच्या कुंडलीमध्ये 2015 सालाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये राहू ११ व्या स्थानात असेल. त्यामुळे तुम्हाला बराच फायदा होईल. हा तुमच्यासाठी अनपेक्षित घटनांचा काळ असणार आहे. या काळात कुटुंबातील सदस्यांचीसुद्धा भरभराट होणार आहे. पण राहू पहिल्या घरात असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक राहिल. पण यात काळजी करण्यासाठे फार कारण नाही. केवळ सतर्क राहा आणि प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे या वर्षातील पहिले सहा महिने प्रेमसंबंध, विवाह आणि मुलांसाठी चांगले असतील. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या दृष्टीनेसुद्धा हा काळ अनुकूल आहे. कन्या राशी भविष्य 2015 अनुसार या वर्षात तुम्हाला खूप संधी मिळणार आहेत आणि जल्लोष करण्यासारखे खूप क्षण येतील. पण या वर्षाच्या उत्तरार्धात मात्र काळजी घेण्याची गरज आहे. तुम्हाला फक्त सतर्क राहण्याची गरज आहे, फार गंभीर घटना घडण्याची शक्यता नाही. खर्चात काही प्रमाणात वाढ होईल आणि प्रकृतीच्या कुरबुरी सुरू राहतील. काळजी करू नका, तुमच्याबद्दल फार वाईट काहीही होणार नाही. त्यामुळे संयमाने आणि विचाराने वागणे योग्य राहील.
कन्या राशीच्या व्यक्तींनी 2015 सालामध्ये करावयाचे उपचार: पिंपळाच्या झाडाला नियमित पाणी घाला.

तुळ राशी भविष्य 2015

तुळ राशी भविष्य 2015तुळ राशींच्या व्यक्तींसाठी 2015 हे वर्ष लाभकारक आहे. तुळा राशींच्या व्यक्तींच्या कौटुंबिक आयुष्याबाबत सांगायचे झाले तर थोडे फार गैरसमज होण्याची शक्यता आहे. असे असले तरी एकोप्याला फार धक्का लागणार नाही. आरोग्याचा विचार करता 2015 साल उत्तम आहे. तुम्ही घर किंवा कार घेण्याचा विचार करत असाल तर आता त्या द्विधा मनस्थितीतून बाहेर पडा. ठोस निर्णय घ्या. 2015 चा उत्तरार्ध हा तुमच्यासाठी गुलाबी काळ असणार आहे. खासगी बाबतीत तुम्हाला अनेक आनंदाचे क्षण लाभणार आहेत. त्यामुळे या गुलाबी वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी तयार राहा. तुळा राशीच्या कुंडलीनुसार या वर्षभरात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी काहीतरी विशेष करून दाखवणार आहात. तुम्हाला नवी उर्जा मिळाली आहे, असे वाटत आहे. नोकरीमध्ये बढती होण्याची खूप शक्यता आहे. लोकांकडून सहकार्य मिळे आणि तुमच्याविषयी असलेल्या आदर आणि सन्मानात वाढ होईल. शनि दुसऱ्या घरात आल्यामुळे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला खर्च करताना हात थोडासा आखडता घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष सकारात्मक राहील.
तुळ राशीच्या व्यक्तींनी 2015 सालात करावयाचा उपाय: कपाळावर केशरी टिळा लावा.

वृश्चिक राशी भविष्य 2015

वृश्चिक राशी भविष्य 20152015 साली बहुतेक ग्रह तुम्हाला अनुकूल असतील. तुम्ही पूर्णपणे सुरक्षित असाल. त्यामुळे 2015 हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगले असेल. वृश्चिक राशीच्या कुंडलीनुसार फक्त शनिच्या स्थानामुळे थोडेसे उतार-चढाव असतील, बाकी सर्व एकदम उत्तम राहील. कारण सगळंच सुरळीत राहिलं तर जगण्यात मजा नाही, थोडे खाचखळगे, अडथळे असतील तर जगण्यातील लज्जत वाढते. कौटुंबिक सौख्य राहील. प्रेमाच्या संदर्भात 2015 हे वर्ष उत्तम राहील. शनि प्रथम स्थानात आल्यामुळे वैवाहिक आयुष्यात काही अडचणी निर्माण होतील. काही वेळाप्रेमासाठी झुरणेही चांगले असते. त्याचप्रमाणे तुम्हाला काही आरोग्याच्या तक्रारी सतावतील. काळजी करू नका, काहीही गंभीर घडणार नाही. हा काळ कामासाठी चांगला आहे. त्यामुळे कामाचा ध्यास घेणाऱ्यांसाठी हा काळ खूपच चांगला असेल. 2015 सालच्या वृश्चिक राशीच्या कुंडलीनुसार आर्थिक स्थिती चांगली राहील. त्यामुळे काय काय खरेदी करायचे आहे, याची एक यादी करून ठेवा. दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होईल. या वर्षाच्या उत्तरार्धात व्यवसायाशी निगडीत शिक्षण घेणाऱ्यांची प्रगती होईल.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी 2015 सालात करावयाचे उपाय: माकडांची सेवा करा आणि मांसाहार व मद्यप्राशन टाळा.

धनु राशी भविष्य 2015

धनु राशी भविष्य 20152015 सालाच्या सुरुवातील गुरू धनु राशीच्या आठव्या घरात आहे, ही फार सकारात्मक बाब नाही. असे असले तरी फारशी नकारात्मकही नाही. त्याचबरोबर शनि १२ व्या घरात आहे, त्यामुळे आर्थिक बाबी विचारपूर्वक हाताळाव्या लागतील. या सगळ्याचे व्यवस्थापन करताना घाबरून जाऊ नका. तुम्हाला माहीत आहे की, आर्थिक बाबतीत ओढाताण झाल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. या समस्या सोडविण्यासाठी कष्ट करा. धनु राशी भविष्य 2015 अनुसार शांत आणि स्थिर मनोवृत्तीच्या व्यक्ती हे साध्य करू शकतात. त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबियांचा वागणुकीतही बदल झालेला तुम्हाला दिसून येईल. या बदलामुळे तुम्ही व्यथित होऊ शकता. प्रत्येक दृष्टिकोनातून तुम्हाला खंबीर करायचे, असे या वर्षाने मनावर घेतल्यासारखे वाटते. तुमच्यात असुरक्षिततेची भावना वाढीस लागेल, त्याचा तुमच्या प्रकृतीवरही परिणाम होईल. प्रेमप्रकरणांमध्येही फारसे समाधान लाभणार नाही. पण लक्षात ठेवा, जे होते, ते चांगल्यासाठीच होते. दुसऱ्या बाजूला 2015 सालाच्या उत्तरार्धात तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ लागतील. तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद निर्माण होईल. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल आणि विद्यार्थ्यांना अनुकूल निकाल मिळतील. हे वर्ष म्हणजे तुमच्यासाठी साहसी प्रवासच असणार आहे!
धनु राशीच्या व्यक्तींनी 2015 सालात करायवायचे उपाय : देवळात तूप आणि बटाटा दान करा.

मकर राशी भविष्य 2015

मकर राशी भविष्य 2015मकर राशीच्या व्यक्तींसाठी 2015 सालातील पहिले सहा महिने उत्तम असतील. तुमच्या अचूक योजनांचे फळ या काळात तुम्हाला मिळेल. तुम्ही बुद्धिमान आहात. तुमच्या राहत्या जागी कार्यक्रमांची रेलचेल राहील. कामाच्या ठिकाणी सर्व काही सकारात्मक राहील. हा तुमच्यासाठी जल्लोष साजरा करण्याचा काळ आहे. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. तुम्हाला सगळीकडूनच सहकार्याचा हात मिळेल. तुमचे लग्नाचे वय झाले असेल तर 2015 सालात या बाबतीत काही सकारात्मक घडण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी खूपच अनुकूल आहे. त्यांचे प्रयत्न निश्चित यशस्वी होणार आहेत. असे असले तरी 2015 सालातील उत्तरार्ध मात्र काहीसा कठीण असेल. त्यावेळी गुरू तुमच्या आठव्या घरात असेल. परिणामी, आर्थिक समस्या उद्भवतील. त्यामुळे काहीही करताना विचारपूर्वक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. पण काळजी करू नका, अशा प्रकारचे गंभीर परिस्थिती उद्भवल्यावर तुम्ही सक्षमपणे तिचा सामना कसा करता हे चाचपण्याचा हा काळ आहे. त्याचप्रमाणे 2015 या वर्षात कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करताना दोन वेळा विचार करावा, असे ही कुंडली सांगते.
मकर राशीच्या व्यक्तींनी 2015 सालात करावयाचे उपाय: दर चार महिन्यांनी शेंडी असलेले नारळ वाहत्या पाण्यात सोडा.

कुंभ राशी भविष्य 2015

कुंभ राशी भविष्य 2015कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी 2015 हे वर्ष समिश्र घटनांचे राहील. 2015 या वर्षाच्या कुंभ राशीच्या कुंडलीनुसार तुमच्या जवळच्या व्यक्तींशी तुमचे संबंध काहीसे ताणलेले राहतील. पण लगेचच त्याने व्यथित होऊ नका, कारण जे काही होते ते चांगल्यासाठीच होते. तुमची काहीशी फटकळ भाषा हे त्यासाठीच एक कारण असू शकेल. त्यामुळे शक्य तितके विनम्रपणे वागा. कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्याच्या तक्रारींमुळे काहीसे तणावाखाली राहाल. पण खूप काळजी करण्याचे कारण नाही, कारण ही काळ पटकन निघून जाईल. तुम्ही कोर्टाकचेरीमध्ये व्यस्त राहाल. पण काळजी करण्याचे कारण नाही, कारण तुम्ही विरोधकांना नेस्तनाभूत कराल. या वर्षाच्या उत्तरार्धात तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये जवळीक निर्माण होईल. वैवाहिक आयुष्य आनंदी असेल. तुम्हाला स्वर्ग केवळ दोन बोटे शिल्लक असेल. कामाच्या ठिकाणीसुद्धा सुधारणा होतील. ही जल्लोष करण्याची वेळ असेल. आर्थिक उत्पन्न आणि शिक्षण यात वाढ होईल. या कालावधीत तुम्ही सगळ्याच बाबतीत सक्रिय असाल.
कुंभ राशीच्या व्यक्तींनी 2015 सालात करावयाचे उपाय: देवळातील भटजींना पिवळ्या रंगाचे कपडे दान करा.

मीन राशी भविष्य 2015

मीन राशी भविष्य 2015मीन राशीच्या व्यक्तींसाठी 2015 हे वर्ष उत्तम प्रकारे सुरू होईल. मीन राशी भविष्य 2015 अनुसार या वर्षात तुमच्या घरी धार्मिक शुभकार्य पार पडेल. तुमच्या घरी समारंभ साजरे करण्याचा हा काळ आहे. असे असेल तरी एखाद्या कौटुंबिक सदस्याच्या उद्धट वागणुकीचा तुम्हाला त्रास होईल. पण त्याकडे दुर्लक्ष करा, असा माझा तुम्हाला सल्ला राहील. केतूचा प्रभाव वाढता राहिल्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. अशा वेळी तुमच्या आहाराच्या सवयींवर लक्ष ठेवणे आवश्यक राहील. मीन राशीची कुंडली सांगते की, या काळात तुम्ही काळजीपूर्वक वाहन चालवा. प्रेम प्रकरणांसाठी हा कालावधी अनुकूल आहे. पण सातव्या घरात असलेला राहू हे फार चांगले चिन्ह नाही. त्यामुळे प्रेम आणि विश्वास हे दोन घटक नेहमीच अत्यंत महत्त्वाचे राहतील. तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकेल. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होईल. असे असले तरी कष्ट आणि जबाबदारी यात वाढ होईल. त्यामुळे तयार राहा. त्याचप्रमाणे या वर्षात तुम्हाला आर्थिक लाभ, पगारवाढ होण्याची शक्यता आहे. अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहे, त्यामुळे हा जल्लोष करण्याचा काळ आहे. शिक्षणासाठी हा अत्यंत अनुकूल असेल, पण 2015च्या उत्तरार्धात काही समस्या उद्भवू शकतात.
मीन राशीच्या व्यक्तींनी 2015 सालात करावयाचे उपाय: देवळात तांदूळ, गूळ आणि मसूर यांचे दान करा.
- पं. हनुमान मिश्रा

मंगळवार, १७ मार्च, २०१५

काय सांगतो तुमच्या शरीरावरचा प्रत्येक तीळ...


       काय सांगतो तुमच्या शरीरावरचा प्रत्येक तीळ...
 



            तुमच्या शरीराच्या विविध भागांवर असलेले तिळंही तुमच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये कथन करतातच सोबत तुम्हाला शुभ-अशुभाचे संकेतदेखील मिळतात....


जाणून घेऊयात... शरीरावर कोणत्या भागावर असणारा तीळ काय सांगतो...

- कपाळाच्या उजव्या भागावर असणारा तीळ समाजात व्यक्तीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा असतो.

- कपाळाच्या मध्यभागी दिसणारा तीळ व्यक्तीच्या भक्कम आर्थिक परिस्थिती व्यक्त करतो.

- दोन भुवयांच्या मध्ये असलेला तीळ व्यक्ती परोपकारी, उदार आणि दिर्घायुषी असल्याचं सांगतो.

- गालांवर असलेला तीळ आर्थिक दृष्टी भरभक्कम पण व्यक्ती दुर्व्यसनी असल्याचं सूचित करतो.

- नाकाच्या उजव्या भागावर असलेला तीळ सुख आणि धनाकडे तर नाकाच्या डाव्या बाजुला असला तीळ कठिण परिश्रण आणि सफलतेकडे निर्देश करतो

- नाकाच्या मध्यावरच तीळ असेल तर व्यक्ती स्थिर वृत्तीची नसून इकडे तिकडे भटकताना दिसते.

- उजव्या गालावर असलेला तीळ प्रगतीशील असल्याचं सांगतो.

- डाव्या गालावर असलेला तीळ अशुभ मानला जातो. असा तीळ गृहस्थ जीवनात धनाची कमतरता सांगतो.

- हनुवटीवर आढळणारा तीळ व्यक्ती स्वार्थी, व्यक्तिवादी, केवळ स्वत:च हित पाहणारा आणि समाजापासून लांबच असलेला असा दिसतो. 

- कंठावर तीळ असेल तर ती व्यक्ती बुद्धिजीवी, सफल आणि स्वावलंबी असलेली आढळते.

- डाव्या हातावर असलेला तीळ शुभ चिन्हं व्यक्त करतो तर उजव्या हातावर तीळ कर्जाची चिन्हं दाखवून देतो.

- पोटाच्या खालच्या भागावर तीळ असेल तर अशी व्यक्ती कामूक असते. अनेक स्त्री पुरुषांच्या शरीरावर अशा प्रकारचे तीळ आढळून येतात