शनिवार, २० जून, २०१५

शनीला प्रसन्न करण्यासाठी काही सोपे उपाय!

शनीला प्रसन्न करण्यासाठी काही सोपे उपाय!

shani

शनिवार हा दिवस शनी देवाचा दिवस आहे. ज्‍योतिषशास्‍त्रानुसार कुंडलीत शनीच्या स्थानाला खास महत्त्व असते. शनीच्‍या शुभ किंवा अशुभ स्थानामुळे मनुष्‍याच्‍या जीवनात सुख- दुखा:ची स्थिती निर्माण होते. शनीचा सर्वाधिक परिणाम साडेसातीमध्‍ये सहन करावा लागतो. प्रत्‍येक व्‍यक्‍तीला शनीची साडेसातीला सामोरे जावे लागते. 

शनीमुळे व्‍यक्‍तीला अत्‍याधिक दुख: किंवा अपयशाचा सामना करावा लागत असेल तर त्‍याने शनिवारी विशेष पूजा केली पाहिजे. शनीला प्रसन्‍न करण्‍यासाठी काही सोपे उपाय सांगण्‍यात आले आहेत. प्रत्‍येक शनिवारी खालील उपाय केल्‍यास लवकरच त्‍याचे शुभ फळ आपल्‍याला मिळेल.

शनीचे अशुभ प्रभाव कमी करण्‍यासाठी शनिवारी काळ्या वस्त्रात काळे उडीद, काळे तीळ आणि लोखंडाची वस्‍तू बांधावी. त्‍याची पूजा करून ते शनीदेवाला अर्पण करावे. त्‍यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्‍यक्तिस काळे वस्त्र आणि त्‍यात गुंडाळलेल्‍या वस्‍तू दान कराव्‍यात. प्रत्येक शनिवारी केल्‍यास काही दिवसातच त्‍याचे सकारात्‍मक फळ मिळण्‍यास प्रारंभ होईल.

तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग-8


Image result for 7
तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग-8

भाग्य अंक 7
https://fbcdn-sphotos-c-a.akamaihd.net/hphotos-ak-xaf1/v/t1.0-9/11032390_1565232300397114_2344977045996052992_n.jpg?oh=5355fc437ca14cbab093f6803a2f407e&oe=55AD8049&__gda__=1433826814_e439c2b72922498b81543fb7f1ec844d
अंक सात (7)
सात अंकाच्या म्हणजे 7,16 व 25 या तारखा पैकी कोणत्याही तारखेला जन्मास आलेल्या व्यक्तींना खालील व्याधी होतात.
अतिशय काळजी करणे, धाप लागणे, गळू होणे, फुटकुळ्या उठणे, रॅॅश उठणे वैगरे.

जोपर्यंत सर्व काही व्यवस्थित चालते तो पर्यंत या व्यक्तीं कितीही काम करू शकतात. पण यांना काळजीने घेरले, की  सगले बिघडते.गोष्टी आहेत त्यापेक्षा खूप वाईट आहे असा समाज करून घेण्याकडे यांचा; कल असतो; त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर लगेच परीणाम होतो . 

या  व्यक्ती अतिशय भावनाप्रधान असतात. जे लोक त्यांचे कौतुक करतील त्यांच्यासाठी काहीही करायची यांची तयारी असते, जी कामे त्यांना आवडतील ती करण्यासाठी वाटेल तेवढे कष्ट या  व्यक्ती घेतात. परंतु  यांचे शरीर तितकसे ताकदवान या कष्टाचा त्यांच्यावर ताण पडतो.

या व्यक्तींवर उपयोगी पडणाऱ्या वनस्पती पुढे दिल्या आहेत.

काकडी कोबी, जव, चीकोटी, सफरचंद, कस्तुरी, द्राक्षे सर्व फळांचे रस.
आरोग्याच्या दुष्टीने 7,16,25, 34, 43, 52,व 65 ही  वयेमहत्वाची आहे. प्रकृतीमध्ये लक्षात येण्याजोगे  बदल घडतील.
जानेवारी, फेब्रुवारी, जुलै, ऑगस्ट  या महिन्यात कामाचा ताण पडू देऊ नका; नाहीतर    प्रकृतीवर  अनिष्ट परीणाम होईल.

शनिवार, ६ जून, २०१५

तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग-7


Image result for 6
तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग-7

भाग्य अंक 6
https://fbcdn-sphotos-c-a.akamaihd.net/hphotos-ak-xaf1/v/t1.0-9/11032390_1565232300397114_2344977045996052992_n.jpg?oh=5355fc437ca14cbab093f6803a2f407e&oe=55AD8049&__gda__=1433826814_e439c2b72922498b81543fb7f1ec844d
अंक सहा (6)
सहा अंकाच्या म्हणजे 6,15 व 23 या तारखा पैकी कोणत्याही तारखेला जन्मास आलेल्या व्यक्तींना खालील व्याधी होतात.
नाक, घसा, फुप्फुसे,यांचे विकार. वाढत्या वयात रक्ताभिसरण बिघडते ; परंतु त्या मानाने व्यक्तींची प्रकृती  ठीक राहते.
या व्यक्तींवर उपयोगी पडणाऱ्या वनस्पती पुढे दिल्या आहेत.
बदाम,सफरचंद, कस्तुरी, अंजीर, डाळिंब,अप्रिकॅाट, अक्रोड, गुलाबाचे पाने.
आरोग्याच्या दुष्टीने 15 ,24 ,42, 51 व 60 ही  वयेमहत्वाची आहे. प्रकृतीमध्ये लक्षात येण्याजोगे  बदल घडतील.
मे,, ऑक्टोबर, नोहेंबर या महिन्यामध्ये जास्त कामामुळे  प्रकृती बिघडेल.
-

ज्या जागेवर घर बांधत आहे तो प्लॉट कसा असावा?

ज्या जागेवर घर बांधत आहे तो प्लॉट कसा असावा?

'उत्तम बांधकामासाठी प्लॉटचा आकार चौरस किंवा समचतुष्कोणीय असला पाहिजे. याने घरात सुख-समृद्धी नांदते. जर प्लॉट चतुष्कोणीय असेल तर त्याच्या लांबी रूंदीचे प्रमाण 10:2 असे असावे, परंतु या सीमेपलीकडे नसावे.

 त्रिकोणी प्लॉट शुभ असल्याचे मानण्यात येत नाही, कारण तशा प्रकारचा प्लॉट भागीदार आणि काम करणारे यांच्या वतीने अडच‍णींना निर्माण करणारा ठरू शकेल.

 अनियमित आकार नसलेले आणि बेढप प्लॉट बांधकामासाठी चांगले नसतात, कारण त्यातून आर्थिक हानी आणि मतभेदांना खतपाणी मिळण्याची शक्यता आहे.

 प्लॉटचा मध्य भाग भोवतालच्या भागाच्या तुलनेनी बसका असायला नको, नाहीतर जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात अडचणींना तोंड द्यावे लागू शकेल.

 उत्तरोन्मुख किंवा पूर्वोन्मुख प्लॉट, दक्षिणोन्मुख किंवा पश्चिमोन्मुख प्लॉटच्या तुलनेन जास्त चांगले असतात.

 जर प्लॉट एखाद्या डोंगरी भागात असेल तर उतरण पूर्व आणि उत्तर दिशेकडे असावी.

 कोणताही कालवा, तलाव, नदी, झरा, विहिर, डबके प्लॉटच्या उत्तरे किंवा पूर्वेस असावे.

 प्लॉटच्या उत्तरेस किंवा पूर्वेस एखादा मोठा वृक्ष नसावा. प्लॉटच्या दक्षिणेस किंवा पश्चिमेस एखादा खड्डा किंवा विहिर नसावी.

 घराच्या दक्षिणेस वाट असली तर तीचे मुख्य द्वार दक्षिण किंवा आग्नेयेस असावे. मुख्य द्वार घराच्या ईशान्येस असावे. दुसरा कोणताच पर्याय नसल्यास पश्चिमेकडे असावे, परंतु स्वैपाक करताना तोंड दक्षिण दिशेकडे कालत्रयी नसावे.

 वेणीफणी करताना तोंड कधीही पूर्वेकडे अथवा पश्चिमेकडे नसावे. टॉयलेट्स सहसा दक्षिण, पश्चिम किंवा वायव्येस असावे. घर अशा रीतीने बांधवे की उत्तरेकडचा किंवा पूर्वेकडचा बराचसा भाग मोकळा असावा.