सोमवार, २७ एप्रिल, २०१५

तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग-4


3 साठी प्रतिमा परिणाम
तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग-4

भाग्य अंक 3
https://fbcdn-sphotos-c-a.akamaihd.net/hphotos-ak-xaf1/v/t1.0-9/11032390_1565232300397114_2344977045996052992_n.jpg?oh=5355fc437ca14cbab093f6803a2f407e&oe=55AD8049&__gda__=1433826814_e439c2b72922498b81543fb7f1ec844d
अंक तीन  (3)
तीन अंकाच्या म्हणजे 3,12,21,व 30 या तारखा पैकी कोणत्याही तारखेला जन्मास आलेल्या व्यक्तींना खालील व्याधी होतात.
मज्जासंस्थेवर जास्त ताण पडणे, न्यूरायटीस, त्वचारोग.कोणतेही काम पोटतिडिकीने करण्याची वृत्ती असल्यामुळे यांच्या प्रकृतीवर ताण पडतो.
या व्यक्तींवर उपयोगी पडणाऱ्या वनस्पती पुढे दिल्या आहेत.
सफरचंद, बदाम, डाळिंब, अंजीर, द्राक्षे, अननस स्ट्रॉबेरी,केशर, बीट, गहू.
आरोग्याच्या दुष्टीने 12,21,29,48 व 57 ,ही वयेमहत्वाची आहे. प्रकृतीमध्ये लक्षात येण्यासारखे बदल घडतील.
डिसेंबर,फेब्रुवारी, ज्यून, सप्टेंबर या महिन्यामध्ये कामाचा ताण वाढल्याने प्रकृतीवर अयोग्य परिणाम होतील..
-

गुरुवार, २३ एप्रिल, २०१५

साडेसाती भाग - 1

साडेसाती  भाग - 1



साडेसाती या शब्दाचा अर्थ ७ || वर्षाचा कालावधी होय. शनि सर्व बारा राशी भ्रमण करण्यास ३० वर्षे घेतो. म्हणजे एका राशित शनि २ || वर्ष वास्तव्य करतो. शनिला ग्रहमालेत " छायामार्तड " संबोधन आहे. छाया ग्रह म्हणजे जो ग्रह ज्या राशितून भ्रमण करीत असेल त्या राशीच्या मागील राशितील ग्रहांना व पुढील राशितील ग्रहांना त्रास करतो. हाच विचार साडेसातीत अपेक्षित आहे. जेव्हा शनि बाराव्या जन्मराशीतून आणि द्वितीयातून भ्रमण करतो तेव्हा हा परिपूर्ण काळ साडेसातीचा मानला जातो.

शनि एका राशित २ || वर्ष असतो. तेव्हा तीन शनिच्या एकूण वास्तव्यास साडेसाती म्हणतात. महत्वाचे म्हणजे शनिची विशिष्ट ग्रहामागील, त्या ग्रहावरून व विशिष्ट ग्रहाच्या पुढील स्थानातून होणारे भ्रमण असा २ || x ३ = ७ || वर्षे काळ त्रासाचा समजला जातो. जन्मपत्रीकेतील मूळ चंद्राराशीच्या मागे व पुढे शनि असे पर्यंत साडेसाती समजली जाते.
उदा. - एखाद्या जातकाची चंद्ररास तूळ असेल तर शनि ने कन्या राशित प्रवेश केल्यापासून ते वृश्चिक राशितून पुढे जाई पर्यंत साडेसाती सुरु होते किंवा जन्मस्थ चंद्र किती अंशावर आहे त्या अंशावर गोचरीने शनि आल्यावर साडेसाती सुरु होते.

जेव्हा चंद्राचे मागील राशितील शनिचे भ्रमण सुरु होते तो साडेसातीचा पूर्वार्ध होय. जन्मस्थ चंद्रावरून शनि भ्रमण करतो त्याला मध्यकाळ, तर चंद्राचे पुढील राशितून शनि जातो त्या वेळेस अंतकाळ वा उत्तरार्ध म्हणतात. यापैंकी कोणता काळ शुभ व अशुभ हे पाहणे महत्वाचे ठरते ते पुढी्ल भागात  पाहू.

रविवार, १९ एप्रिल, २०१५

अक्षय तृतीयेला 11 वर्षांनंतर येतो महामंगल योग


अक्षय तृतीया साठी प्रतिमा परिणामshoping साठी प्रतिमा परिणाम

अक्षय तृतीयेला 11 वर्षांनंतर येतो  महामंगल योग

हे आहेत खरेदीचे महामुहुर्त
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने लोकांना बाजारातून शुभकार्यासाठी खरेदी करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. खरेदीसाठी अक्षय तृतीयेच्या पाच दिवस अगोदरच म्हणजे 17 एप्रिलपासून 26 एप्रिलपर्यंत शुभ मुहूर्त राहतील. या दहा दिवसांमधील प्रत्येक दुसर्‍या दिवशी सर्वार्थसिद्धी, अमृत सिद्धी आणि रवि पुष्य नक्षत्राचे खरेदीचे महामुहुर्त जुळून येत आहेत. पं. व्यास यांच्यानुसार 14 एप्रिलला सूर्याने मेष राशीत प्रवेश करताच शुभतेची सुरुवात झाली आहे. ग्रह-नक्षत्राची शुभस्थिती खरेदीमध्ये वृद्धी करेल.

कोणत्या दिवशी कोणता शुभ योग -
1. 17 एप्रिल, शुक्रवारी संध्याकाळी 07.50 पासून अमृतसिद्धी योग राहील.
2. 19 एप्रिल, रविवारी सकाळी 06.07 पासून सर्वार्थसिद्धी योग संध्याकाळी 04.03 पर्यंत राहील
3. 21 एप्रिल, मंगळवारी सकाळी 06.05 पासून सर्वार्थसिद्धी योग 02.25 पर्यंत राहील
4. 22 एप्रिल, बुधवारी सकाळी 06.04 पासून सर्वार्थसिद्धी योग दिवसभर राहील.
5. 24 एप्रिल, शुक्रवारी सर्वार्थसिद्धी योग 12.05 पासून दिवसभर राहील.
6. 26 एप्रिल, रविवारी सकाळी 06.01 पासून रविपुष्य योग संध्याकाळी 06.03 पर्यंत राहील.
जाणून घ्या राशीनुसार काय खरेदी करावे... हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
Click arrow साठी प्रतिमा परिणाम

तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग- 3


2 साठी प्रतिमा परिणाम
तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग- 3

भाग्य अंक 2
https://fbcdn-sphotos-c-a.akamaihd.net/hphotos-ak-xaf1/v/t1.0-9/11032390_1565232300397114_2344977045996052992_n.jpg?oh=5355fc437ca14cbab093f6803a2f407e&oe=55AD8049&__gda__=1433826814_e439c2b72922498b81543fb7f1ec844d
अंक दोन (2)
दोन अंकाच्या म्हणजे 2,11,20,व 29 या तारखा पैकी कोणत्याही तारखेला जन्मास आलेल्या व्यक्तींना खालील व्याधी होतात.
पोटाचे विकार, पचनसंस्थेत बिघाड, अन्नातून विषबाधा, आतडयाना सूज येणे, आतील अवयांची वाढ होणे, ट्यूमर, वात विकाराचा त्रास.
काकडी, कोबी, कलिंगड, जवसाचे बी, खरबूज.
आरोग्याच्या दुष्टीने 20,25,29,43,47,52 व ,65,ही वयेमहत्वाची आहे. प्रकृतीमध्ये लक्षात येण्यासारखे बदल होतील.
जानेवारी,फेब्रुवारी, जुलै या महिन्यात प्रकृतीला  जास्त जपले पाहिजे.
-

सोमवार, १३ एप्रिल, २०१५

कोणत्या राशीच्या मुला मुलींनी आपसात लग्न करू नये ?

 कोणत्या राशीच्या मुला मुलींनी आपसात लग्न करू नये ?


लग्न हे एक पवित्र बंधन आहे. या बंधनात बांधले जाण्यापूर्वी जाणून घ्या की, तुम्ही ज्या व्यक्तीशी लग्न करणार आहात तिची रास कोणती आहे ? कारण हे बंधन केवळ एका जन्मासाठी नसून सात जन्मांसाठीचे बंधन आहे. जर तुमची आणि तुमच्या जीवनसाथीची राशी दोषपूर्ण झाली तर संपूर्ण जीवनभर भांडण-तंटे होत राहतील.
ज्योतिष शास्त्रानुसार पती आणि पत्नीत षडाष्टक दोष आणि द्विद्वादश योग असायला नको. या दोन्हीपैकी एक जरी दोष असला तरी नवरा-बायकोतील भांडण ठरलेलेच आहे.
मुलाची रास : मुलीची रास
मेष- वृषभ आणि कन्या

वृषभ- मिथुन आणि तुला

मिथुन- कर्क आणि वृश्चिक

कर्क- सिंह आणि धनु

सिंह- कन्या आणि मकर

कन्या- तुला आणि कुंभ

तुला- वृश्चिक आणि मीन

वृश्चिक- धनु आणि मेष

धनु- मकर आणि वृषभ

मकर- कुंभ आणि मिथुन

कुंभ- मीन आणि कर्क

मीन- मेष आणि सिंह

मंगळवार, ७ एप्रिल, २०१५

तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग 2


https://fbcdn-sphotos-c-a.akamaihd.net/hphotos-ak-xaf1/v/t1.0-9/11032390_1565232300397114_2344977045996052992_n.jpg?oh=5355fc437ca14cbab093f6803a2f407e&oe=55AD8049&__gda__=1433826814_e439c2b72922498b81543fb7f1ec844d

तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य 
अंक एक (1)
 no. 1 साठी प्रतिमा परिणाम

एक अंकाच्या म्हणजे 1,10,19,व 28 या तारखा पैकी कोणत्याही तारखेला जन्मास आलेल्या व्यक्तींना खालील व्याधी होतात.
hart attack साठी प्रतिमा परिणाम
हदयविकार, धाप लागणे, अनियमित रक्ताभिसरण,  

 या व्यक्तींनी जास्तीत जास्त शक्य असेल तेवढा मध खावा, तसेच दररोज टॉमाटो खाणे.

आरोग्याच्या दुष्टीने 10,19,28,37, आणी 55 या वयात सावध राहावे प्रकृतीमध्ये महत्वाचे बदल होतील.
आक्टोबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यात जास्त कामाच्या ताणामुळे प्रकृती बिघडेल. 

शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

ग्रहणाचे 12 राशीवर होणारे परिणाम .

 ग्रहणाचे 12  राशीवर होणारे  परिणाम .....

मेष -

या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण शुभफळ देणारे राहील. धनलाभ आणि सहाव्या राशीमध्ये चंद्रग्रहण असल्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण होतील तसेच संथ कामामध्ये गती येईल. वादग्रस्त प्रकरणांमध्ये विजय प्राप्त होईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल.
या राशीच्या लोकानी  ॐ अंगारकाय नम :  या मंत्राचा जप करावा.
वृषभ -
या राशीपासून पाचव्या राशीमध्ये ग्रहण लागेल. हे चंद्रग्रहण या राशीच्या लोकांना सामान्य फळ प्रदान करेल. वाईट काळ समाप्त होईल आणि चांगल्या कामामध्ये मन लागेल. निराशा दूर होईल. नातेवाईकांशी बिघडलेले संबंध सुधारतील आणि धनाची आवक सामान्य राहील.
या राशीच्या लोकानी  ॐ श्रीये नम :  या मंत्राचा जप करावा.
मिथुन -
या राशीपासून चौथ्या राशीत चंद्रग्रहण होईल. हा काळ मिथुन राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याचा आहे. चिंता वाढवणारे कोणतेही काम करू नका. धनाची आवक कमजोर होऊ शकते. गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता आहे. वादापासून दूर राहा.
या राशीच्या लोकानी  ॐ विष्णवे नम :  या मंत्राचा जप करावा.
कर्क -
या राशीपासून तिसर्‍या राशीत होणारे चंद्रग्रहण शुभफळ देणारे राहील. शुभ वार्ता समजतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील तसेच आरोग्याची उत्तम राहील. उसने दिलेल्या पैशांची वसुली होईल तसेच संपत्तीमध्ये लाभाचे योग आहेत. नवीन कार्याची सुरुवातही होऊ शकते.
या राशीच्या लोकानी  ॐ सुभगा भैरवी नम :  या मंत्राचा जप करावा.
सिंह -
या राशीपासून दुसर्या राशीतील चंद्रग्रहण सामान्य फळ देणारे राहील. शुभ सूचना मिळतील, परंतु मन उदास राहील. मनासारखे यश प्राप्त होण्याची शक्यता कमी आहे. पुढे जाण्यासाठी मदत करणारे लोक मागे सरकतील. आजार वाढण्याची शक्यता आहे.
या राशीच्या लोकानी   ॐ केशवाय नम :  या मंत्राचा जप करावा.
कन्या -
राहू आणि चंद्राचे गोचर या राशीमध्ये ग्रहण योग तयार करत आहे. अत्यंत सावध राहण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक काम सावधपणे करा. वादाची स्थिती निर्माण झाल्यास तेथून जाणेच फायद्याचे ठरेल. वाहन चालवताना काळजी घ्या तसेच गुंतवणुकीपासून दूर राहा.
या राशीच्या लोकानी   ॐ श्री ह्री क्ली कुबेराय नम :  या मंत्राचा जप करावा.
तूळ -
बाराव्या राशीतील चंद्रग्रहण सांभाळून राहण्याचा संकेत देत आहे. उत्पन्नात कमी आणि चिंतेमध्ये वृद्धी होऊ शकते. कार्यक्षमता कमजोर होऊ शकते. नातेवाईकांशी वाद आणि विरोधक प्रभावी होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अपमान होण्याची शक्यता आहे.
या राशीच्या लोकानी   ॐ ह्री पद्मे स्वाहा :  या मंत्राचा जप करावा.
वृश्चिक -
अकराव्या राशीतील चंद्रग्रहण शुभफळ देणारे राहील. शुभ वार्ता आणि उत्पन्न वृद्धीचे संकेत आहेत. कार्यप्रणालीमध्ये सुधार होईल. संपत्तीमधून लाभ तसेच अपूर्ण कार्य पूर्ण होईल. विरोधक परास्त होतील. आरोग्य उत्तम राहील.
या राशीच्या लोकानी   ॐ भद्र गणेशाय नम :  या मंत्राचा जप करावा.
धनु -
दहाव्या राशीतील चंद्रग्रहण या राशीच्या लोकांना सामान्य फळ देणारे राहील. उत्पन्न सामान्य राहील आणि चिंतांमधून मुक्ती मिळेल. एखादी नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते. अधिकारी प्रसन्न राहतील, परंतु काम जास्त करावे लागेल. विरोधकांना पराभूत करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील.
या राशीच्या लोकानी    ॐ द्रांम दत्तात्रेयाय नम :  या मंत्राचा जप करावा.
मकर -
या राशीपासून नवव्या राशीमध्ये होणार्‍या चंद्र ग्रहणाचा प्रभाव या राशीच्या लोकांवर राहील. न्यायालयीन आणि वादग्रस्त प्रकरणांमध्ये स्वतःचा पक्ष ठेवण्यासाठी वेळ मिळेल. नोकरीत बदल होऊ शकतो. जबाबदारी वाढू शकते तसेच कुटुंबियांची मदत मिळेल.
या राशीच्या लोकानी    ॐ प्रां,प्रीं,प्रौ शं शनैश्चराय नम:  या मंत्राचा जप करावा.
कुंभ -
आठव्या राशीतील चंद्रग्रहण अशुभ फळाचे सूचक आहे. आजार वाढण्याची शक्यता आहे. मुलांकडून दुःख प्राप्त होण्याचे योग जुळून येत आहेत. नोकरीत चिंता वाढवणारी बातमी समजू शकते. हा कला शांत राहण्याचा आहे. कोणाशीही वाद घालू नये तसेच कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
या राशीच्या लोकानी  ॐ कार्तविर्याय नम :  या मंत्राचा जप करावा.
मीन -
सातव्या राशीतील चंद्रग्रहण सामान्य फळ देणारे राहील. नवीन काम करण्याची संधी मिळेल आणि कार्यशैलीत सुधार होईल. धनाची कमतरता जाणवेल. कुटुंबियांची मदत मिळेल. प्रत्येक काम विचारपूर्वक आणि योग्य मार्गदर्शनाने केल्यास यश प्राप्त होईल.
या राशीच्या लोकानी  ॐ दुर्गायै नम :  या मंत्राचा जप करावा.

चंद्रग्रहण (खग्रासग्रहण)

खग्रास चंद्रग्रहण साठी प्रतिमा परिणाम
चंद्रग्रहण (खग्रासग्रहण)
चैत्र शुक्ल पौर्णिमा दि 4 एप्रिल 2015 रोजी होणारे   चंद्रग्रहण :- ग्रहणस्पर्श   दुपारी 3.45 / ग्रहणमध्य :  सायं 5.30 / ग्रहणमोक्ष : सायं. 7.15 मि होत आहे. या ग्रहण भारता मध्ये हे दिसणार असल्याने चंद्रोद्या पासून मोक्ष ग्रहण पर्वकाळ पाळावा..
 
ग्रहणाचे वेध :-
या ग्रहणाचे वेध शनिवारी सुर्योद्यापासून सुरू होत आहे.लहान मुले, वृद्द व गर्भवतीस्त्रियांनी ते स. 11वा.  पासून पाळावेत.
ग्रहण काळात ही कामे करू नयेत....
ग्रहण काळात पूजा करू नये
चंद्रग्रहण काळात कोणत्याही प्रकारची पूजा करू नये. याच कारणामुळे ग्रहण काळात सर्व मंदिरांचे पट (दरवाजे) बंद ठेवले जातात. या दरम्यान केवळ मंत्रांचा मानसिक जप केला जातो. मानसिक जप म्हणजे आवाज न करता हळू-हळू मंत्रांचा मनातल्या मनात जप करणे. मंत्र कोणताही असू शकतो, उदा. ऊँ नम: शिवाय, श्रीराम, सीताराम, ऊँ रामदूताय नम: इ. तुम्ही तुमच्या कुलदैवताच्या मंत्रांचा जप करू शकता.

ग्रहण काळात स्वयंपाक करू नये...
शास्त्रानुसार ग्रहण काळात स्वयंपाक करू नये तसेच काहीही खाऊ नये. ग्रहणकाळात घरात असलेल्या अन्नावर तुळशीचे पान ठेवावे. यासाठी सूर्यास्तापूर्वी तुळशीची पानं तोडून ठेवावीत. तुळशीचे पानं अन्नावर ठेवल्यास ग्रहणाचा वाईट प्रभाव त्यावर पडत नाही.
ग्रहण काळात झोपू नये....
ग्रहण काळात झोपल्यास आरोग्याशी संबंधित अडचणींना सामोरे जावे लागू शकते. यामुळे पूर्ण स्वस्थ व्यक्तीने ग्रहण काळात झोपू नये. गर्भवती, रोगी आणि वृद्धजन या काळात विश्राम करू शकतात.
गर्भवती स्त्रियांनी घराबाहेर पडू नये...
ग्रहणकाळात अशुभ शक्तींचा प्रभाव जास्त असतो. ही शक्ती गर्भवती स्त्रिया आणि त्यांच्या गर्भातील बाळासाठी अशुभ असतात. अशा स्त्रिया ग्रहणकाळात घराबाहेर पडल्यास वाईट शक्तींचा प्रभाव त्यांच्यावर आणि गर्भातील बाळावर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्रहणकाळात त्यांनी घराबाहेर पडू नये. ग्रहणकाळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते आणि शारीरीकरित्या अशक्त व्यक्तिवर त्यांचा लवकर परिणाम होतो. गर्भावस्थेतील स्त्री ही शारीरीकदृष्ट्या अशक्त असते. त्यामुळे अशा वाईट प्रभावांपासून दूर राहणेच त्यांच्यादृष्टीने बरे आहे.
ग्रहण काळात तेल मालिश करू नये....
जे लोक ग्रहण काळात तेल मालिश करतात, त्यांना त्वचेशी संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते. तसेच मूत्र विसर्जन, अभ्यंगस्नान, शक्योतो  टाळावे.
ग्रहणकाळात पती-पत्नीने समागम( सेक्स) करू नये....
ग्रहण काळात पती-पत्नीने संयम ठेवणे आवश्यक आहे. जर ग्रहणकाळात पती-पत्नीने समागम( सेक्स) केल्यास, हे अशुभ मानले जाते. शास्त्रानुसार ग्रहणकाळात केल्या गेलेल्या संबंधांमुळे उत्पन्न झालेलं आपत्य राक्षस समान असते म्हणजे त्या आपत्यामध्ये अनेक दुर्गुण असू शकतात. यामुळे पती-पत्नीने ग्रहण काळात या गोष्टीपासून दूरच राहावे.
या लोकांनी ग्रहण काळात घरातच राहावे ....
जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहण योग म्हणजे कुंडलीतील एखाद्या स्थानात चंद्र-केतू किंवा चंद्र-राहू किंवा सूर्य आणि केतू एकत्रित असतील तर ग्रहण योग तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत ग्रहण योग असल्यास त्या व्यक्तीने ग्रहण काळात घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडल्यास ग्रहणाचा वाईट प्रभाव व्यक्तीच्या आरोग्यावर पडू शकतो.
ग्रहण काळात ही कामे करावी…..
ग्रहण कालावधीत स्नान,दान,होम,तर्पण,श्राद्ध,मंत्र पुर्शचरण करावे .ग्रहणात वृद्धी व सुतक यांचा दोष नाही,ग्रहण लागण्याच्या सुरूवातीलाच तुलसीपत्र वापरले तर दोष लागणार नाहीत.
ग्रहणानंतर ही  कामे करावी…...
मोक्षा नंतर नदीत स्नान शुभ मानले जाते. कोणत्याही नदीला   गंगा समजून  स्नान करावे. ग्रहणानंतर घर तसेच ठेवू नये. ग्रहण संपल्यानंतर देवघर आणि घराची पूर्ण स्वच्छता करावी. देवांच्या मूर्तींना अभिषेक करावा.
 

तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग 1

तुमचा भाग्य अंक - तुमचे आरोग्य भाग 1
    जीवनात सर्वात महत्व कशाला असेल तर आरोग्याला  प्रकृती साथ देत नसेल तर कोणत्याही  गोष्टीत सुख किवा समाधान लाभणार नाही. तुमच्या भाग्य अंकाचा जसा इतर गोष्टीशी  सबंध आहे तसा आरोग्याशीसुध्दा आहे.
ज्या लोकांनी या अंकाचे गूढ विज्ञान शोधून काढले , त्यांनी वनस्पतीचा आभ्यास करून कोणती वनस्पती (धान्य/ फळ/पाले भाजी ) कोणत्या अंकाच्या व्यक्तीला जास्त उपयुक्त आहे हेही ज्ञान आत्मसात केले. निसर्गात ज्या वनस्पती सापडतात त्यांचा संबंध 9 ग्रहांशी असतो. इतकेच नव्हे, तर कोणत्याही व्यक्तीचा जन्म ज्या महिन्यात झाला आहे, त्या महिन्याशी  संबंधीत अशा वनस्पतीसुद्धा आहेत.
1 ते 9 यामधील प्रत्यक अंकाशी संबंधीत  असणाऱ्या   व्याधी कोणत्या व त्यावर कोणत्या उपोयोगी पडतील , याची  माहिती पुढील भागात दिली आहे.