मिथुन


साप्ताहिक राशिभविष्य

७ ते १३ जून २०१५ 

ARROW LEFT AND RIGHT साठी प्रतिमा परिणाम
मिथुन
स्थितप्रज्ञ राहा व्ययात रवी, मंगळ, बुध. चतुर्थात राहू. षष्ठात शनी अशा विरोधी भूमिकेतून ग्रहांचा प्रवास सुरू आहे. त्यामुळे जीवन प्रवासातील महत्त्वाचे निर्णय खूपच सावधतेने घ्यावेत. मानसिक त्रासावर स्थितप्रज्ञता हा नामी उपाय आहे. तो उपयोगात आणावा. होणाऱ्या चांगल्या- वाईट घटनेत मनाला जास्त गुंतवू नका. आपल्यापाशी असलेली जिद्द आणि हुशारी खूपच मदतीची ठरेल. वेळेचे भान ठेवा. आयुष्यातला वेळ सत्कारणी लावा. पैशापेक्षा वेळेची किंमत मोठी आहे. फुकट गेलेला वेळ परत हाती लागत नाही. दिनांक : ८, ९, १०, १३ शुभकाळ महिलांना : प्रयत्नांतून प्रश्न सुटतील, नवीन परिचय वाढतील. वादविवादापासून लांब राहा.
ARROW LEFT AND RIGHT साठी प्रतिमा परिणाम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा