रविवार, ३ मे, २०१५

साडेसाती भाग - 2

साडेसाती  भाग - 2
शनीची साडेसाती कोणत्या राशीला किती काळ चांगला व अनिष्ट असते
1) मेष : ज्यांची मेष राशी असेल त्यांना मीन राशीत शनी आल्याबरोबर साडेसाती सुरू होते. तेव्हा पहिली अडीच वर्षे व शेवटची अडीच वर्षे चांगली जातात. परंतु मेष राशीत शनी आला म्हणजे मधली अडीच वर्षे अनिष्ट जातात. 
2) वृषभ : ज्यांची वृषभ राशी आहे त्यांना मेष राशीत शनी आला की साडेसाती पुन्हा सुरू होते व पहिलीच अडीच वर्षे अनिष्ट जातात. पुढील पाच वर्षे त्रासदायक जात नाहीत. 
3) मिथुन : यांची मिथुन राशी आहे त्यांना वृषभ राशीत शनी आला की साडेसाती सुरू होते. पहिली पाच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात. 
 4) कर्क : ज्यांची कर्क राशी आहे त्यांना शनी मिथुन राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात. 
5) सिंह : ज्यांची सिंह राशी आहे त्यांना शनी कर्क राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात. 
6) कन्या : ज्यांची कन्या राशी आहे त्यांना शनी सिंह राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे त्रासदायक जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे चांगली जातात. 
 7) तूळ : ज्यांची तूळ राशी आहे त्यांना शनी कन्या राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात. 
8) वृश्चिक : ज्यांची वृश्चिक राशी आहे त्यांना शनी तूळ राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. मधली अडीच वर्षे त्रासदायक जातात. शेवटची अडीच वर्षे सम 
9) धनू : ज्यांची धनू राशी आहे त्यांना शनी वृश्चिक राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे त्रासदायक जातात. शेवटची पाच वर्षे चांगली जातात. 
10) मकर : ज्यांची मकर राशी आहे त्यांना शनी धनू राशीत आला की साडेसाती सुरू होते. संपूर्ण साडेसात वर्षे चांगली जातात. 
 11) कुंभ : ज्यांची कुंभ राशी आहे त्यांना शनी मकर राशीत आला की साडेसाती सुरू होते. संपूर्ण साडेसात वर्षे चांगली जातात. 
 12) मीन : ज्यांची मीन राशी आहे त्यांना शनी कुंभ राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली पाच वर्षे चांगली जातात. शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात. शनीची चांगली जातात.
राशीनिहाय साडेसातीची फळे खालीलप्रमाणे:
मेष- आर्थिक अडचणी निर्माण होतील, आरोग्य बिघडेल.
वृषभ- वैवाहिक असमाधान, मनस्ताप.
मिथुन- व्यवसायात वाढ, तीर्थयात्रा.
कर्क- संततीची चिंता, शेअर्समध्ये तोटा.
सिंह- दु:खदायक काळ, घरामध्ये कलह.
कन्या- प्रत्येक कार्यात यश.
तूळ- नेत्रपीडा, पैशाचा नाश.
वृश्‍चिक- मानसिक अस्वस्थता.
धनु- निरर्थक त्रास, मनस्ताप.
मकर- भरभराटीचा काळ.
कुंभ- नवीन कार्यारंभ होतील, आरोग्य सुधारेल.
मीन- आर्थिक लाभ पण मानहानी.

शनीची चांगली फळे केव्हा मिळतात?
जन्मराशीपासून दुसरा, सहावा, दहावा,अकरावा शनी गोचरीने आला म्हणजे त्याची चांगली फळे अनुभवास येतात.

विद्यार्थ्यांस परीक्षेत यश मिळते. उद्योगधंद्याची भरभराट होते. नोकरीत बढती मिळते. अधिकार मिळतात. पराक्रम आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. समाजात मानसन्मान मिळतो. सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात. घरात मंगलकार्ये घडतात. तिसरा शनी आला म्हणजे द्रव्यलाभ होतो. वादविवादात यश मिळते. अशा शनीत काही गोष्टी अनिष्टही घडतात. उदाहरणार्थ पराक्रमाला चांगला असला तरी संततीविषयी त्रासदायक गोष्टी घडतात. द्रव्याचा खर्च फार होतो. आजारपणात काळ जातो. मनाला त्रासदायक गोष्टी अशाच वेळी घडतात.
शनीची साडेसातीचा त्रास कमी होण्यासाठी त्यावरील उपाय/ नियमपुढील भागात पाहू !
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा