तुमच्या शरीराच्या
विविध भागांवर असलेले तिळंही तुमच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये कथन करतातच सोबत
तुम्हाला शुभ-अशुभाचे संकेतदेखील मिळतात....
जाणून
घेऊयात... शरीरावर कोणत्या भागावर असणारा तीळ काय सांगतो...
- कपाळाच्या
उजव्या भागावर असणारा तीळ समाजात व्यक्तीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारा असतो.
- कपाळाच्या
मध्यभागी दिसणारा तीळ व्यक्तीच्या भक्कम आर्थिक परिस्थिती व्यक्त करतो.
- दोन भुवयांच्या
मध्ये असलेला तीळ व्यक्ती परोपकारी, उदार आणि
दिर्घायुषी असल्याचं सांगतो.
- गालांवर
असलेला तीळ आर्थिक दृष्टी भरभक्कम पण व्यक्ती दुर्व्यसनी असल्याचं सूचित करतो.
- नाकाच्या
उजव्या भागावर असलेला तीळ सुख आणि धनाकडे तर नाकाच्या डाव्या बाजुला असला तीळ कठिण
परिश्रण आणि सफलतेकडे निर्देश करतो
- नाकाच्या
मध्यावरच तीळ असेल तर व्यक्ती स्थिर वृत्तीची नसून इकडे तिकडे भटकताना दिसते.
- उजव्या
गालावर असलेला तीळ प्रगतीशील असल्याचं सांगतो.
- डाव्या
गालावर असलेला तीळ अशुभ मानला जातो. असा तीळ गृहस्थ जीवनात धनाची कमतरता सांगतो.
- हनुवटीवर
आढळणारा तीळ व्यक्ती स्वार्थी, व्यक्तिवादी, केवळ स्वत:च
हित पाहणारा आणि समाजापासून लांबच असलेला असा दिसतो.
- कंठावर तीळ
असेल तर ती व्यक्ती बुद्धिजीवी, सफल आणि
स्वावलंबी असलेली आढळते.
- डाव्या
हातावर असलेला तीळ शुभ चिन्हं व्यक्त करतो तर उजव्या हातावर तीळ कर्जाची चिन्हं
दाखवून देतो.
- पोटाच्या
खालच्या भागावर तीळ असेल तर अशी व्यक्ती कामूक असते. अनेक स्त्री पुरुषांच्या
शरीरावर अशा प्रकारचे तीळ आढळून येतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा