शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

चंद्रग्रहण (खग्रासग्रहण)

खग्रास चंद्रग्रहण साठी प्रतिमा परिणाम
चंद्रग्रहण (खग्रासग्रहण)
चैत्र शुक्ल पौर्णिमा दि 4 एप्रिल 2015 रोजी होणारे   चंद्रग्रहण :- ग्रहणस्पर्श   दुपारी 3.45 / ग्रहणमध्य :  सायं 5.30 / ग्रहणमोक्ष : सायं. 7.15 मि होत आहे. या ग्रहण भारता मध्ये हे दिसणार असल्याने चंद्रोद्या पासून मोक्ष ग्रहण पर्वकाळ पाळावा..
 
ग्रहणाचे वेध :-
या ग्रहणाचे वेध शनिवारी सुर्योद्यापासून सुरू होत आहे.लहान मुले, वृद्द व गर्भवतीस्त्रियांनी ते स. 11वा.  पासून पाळावेत.
ग्रहण काळात ही कामे करू नयेत....
ग्रहण काळात पूजा करू नये
चंद्रग्रहण काळात कोणत्याही प्रकारची पूजा करू नये. याच कारणामुळे ग्रहण काळात सर्व मंदिरांचे पट (दरवाजे) बंद ठेवले जातात. या दरम्यान केवळ मंत्रांचा मानसिक जप केला जातो. मानसिक जप म्हणजे आवाज न करता हळू-हळू मंत्रांचा मनातल्या मनात जप करणे. मंत्र कोणताही असू शकतो, उदा. ऊँ नम: शिवाय, श्रीराम, सीताराम, ऊँ रामदूताय नम: इ. तुम्ही तुमच्या कुलदैवताच्या मंत्रांचा जप करू शकता.

ग्रहण काळात स्वयंपाक करू नये...
शास्त्रानुसार ग्रहण काळात स्वयंपाक करू नये तसेच काहीही खाऊ नये. ग्रहणकाळात घरात असलेल्या अन्नावर तुळशीचे पान ठेवावे. यासाठी सूर्यास्तापूर्वी तुळशीची पानं तोडून ठेवावीत. तुळशीचे पानं अन्नावर ठेवल्यास ग्रहणाचा वाईट प्रभाव त्यावर पडत नाही.
ग्रहण काळात झोपू नये....
ग्रहण काळात झोपल्यास आरोग्याशी संबंधित अडचणींना सामोरे जावे लागू शकते. यामुळे पूर्ण स्वस्थ व्यक्तीने ग्रहण काळात झोपू नये. गर्भवती, रोगी आणि वृद्धजन या काळात विश्राम करू शकतात.
गर्भवती स्त्रियांनी घराबाहेर पडू नये...
ग्रहणकाळात अशुभ शक्तींचा प्रभाव जास्त असतो. ही शक्ती गर्भवती स्त्रिया आणि त्यांच्या गर्भातील बाळासाठी अशुभ असतात. अशा स्त्रिया ग्रहणकाळात घराबाहेर पडल्यास वाईट शक्तींचा प्रभाव त्यांच्यावर आणि गर्भातील बाळावर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्रहणकाळात त्यांनी घराबाहेर पडू नये. ग्रहणकाळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते आणि शारीरीकरित्या अशक्त व्यक्तिवर त्यांचा लवकर परिणाम होतो. गर्भावस्थेतील स्त्री ही शारीरीकदृष्ट्या अशक्त असते. त्यामुळे अशा वाईट प्रभावांपासून दूर राहणेच त्यांच्यादृष्टीने बरे आहे.
ग्रहण काळात तेल मालिश करू नये....
जे लोक ग्रहण काळात तेल मालिश करतात, त्यांना त्वचेशी संबंधित आजार होण्याची शक्यता वाढते. तसेच मूत्र विसर्जन, अभ्यंगस्नान, शक्योतो  टाळावे.
ग्रहणकाळात पती-पत्नीने समागम( सेक्स) करू नये....
ग्रहण काळात पती-पत्नीने संयम ठेवणे आवश्यक आहे. जर ग्रहणकाळात पती-पत्नीने समागम( सेक्स) केल्यास, हे अशुभ मानले जाते. शास्त्रानुसार ग्रहणकाळात केल्या गेलेल्या संबंधांमुळे उत्पन्न झालेलं आपत्य राक्षस समान असते म्हणजे त्या आपत्यामध्ये अनेक दुर्गुण असू शकतात. यामुळे पती-पत्नीने ग्रहण काळात या गोष्टीपासून दूरच राहावे.
या लोकांनी ग्रहण काळात घरातच राहावे ....
जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहण योग म्हणजे कुंडलीतील एखाद्या स्थानात चंद्र-केतू किंवा चंद्र-राहू किंवा सूर्य आणि केतू एकत्रित असतील तर ग्रहण योग तयार होतो. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत ग्रहण योग असल्यास त्या व्यक्तीने ग्रहण काळात घराबाहेर पडू नये. घराबाहेर पडल्यास ग्रहणाचा वाईट प्रभाव व्यक्तीच्या आरोग्यावर पडू शकतो.
ग्रहण काळात ही कामे करावी…..
ग्रहण कालावधीत स्नान,दान,होम,तर्पण,श्राद्ध,मंत्र पुर्शचरण करावे .ग्रहणात वृद्धी व सुतक यांचा दोष नाही,ग्रहण लागण्याच्या सुरूवातीलाच तुलसीपत्र वापरले तर दोष लागणार नाहीत.
ग्रहणानंतर ही  कामे करावी…...
मोक्षा नंतर नदीत स्नान शुभ मानले जाते. कोणत्याही नदीला   गंगा समजून  स्नान करावे. ग्रहणानंतर घर तसेच ठेवू नये. ग्रहण संपल्यानंतर देवघर आणि घराची पूर्ण स्वच्छता करावी. देवांच्या मूर्तींना अभिषेक करावा.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा