शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

ग्रहणाचे 12 राशीवर होणारे परिणाम .

 ग्रहणाचे 12  राशीवर होणारे  परिणाम .....

मेष -

या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण शुभफळ देणारे राहील. धनलाभ आणि सहाव्या राशीमध्ये चंद्रग्रहण असल्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण होतील तसेच संथ कामामध्ये गती येईल. वादग्रस्त प्रकरणांमध्ये विजय प्राप्त होईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल.
या राशीच्या लोकानी  ॐ अंगारकाय नम :  या मंत्राचा जप करावा.
वृषभ -
या राशीपासून पाचव्या राशीमध्ये ग्रहण लागेल. हे चंद्रग्रहण या राशीच्या लोकांना सामान्य फळ प्रदान करेल. वाईट काळ समाप्त होईल आणि चांगल्या कामामध्ये मन लागेल. निराशा दूर होईल. नातेवाईकांशी बिघडलेले संबंध सुधारतील आणि धनाची आवक सामान्य राहील.
या राशीच्या लोकानी  ॐ श्रीये नम :  या मंत्राचा जप करावा.
मिथुन -
या राशीपासून चौथ्या राशीत चंद्रग्रहण होईल. हा काळ मिथुन राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याचा आहे. चिंता वाढवणारे कोणतेही काम करू नका. धनाची आवक कमजोर होऊ शकते. गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता आहे. वादापासून दूर राहा.
या राशीच्या लोकानी  ॐ विष्णवे नम :  या मंत्राचा जप करावा.
कर्क -
या राशीपासून तिसर्‍या राशीत होणारे चंद्रग्रहण शुभफळ देणारे राहील. शुभ वार्ता समजतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील तसेच आरोग्याची उत्तम राहील. उसने दिलेल्या पैशांची वसुली होईल तसेच संपत्तीमध्ये लाभाचे योग आहेत. नवीन कार्याची सुरुवातही होऊ शकते.
या राशीच्या लोकानी  ॐ सुभगा भैरवी नम :  या मंत्राचा जप करावा.
सिंह -
या राशीपासून दुसर्या राशीतील चंद्रग्रहण सामान्य फळ देणारे राहील. शुभ सूचना मिळतील, परंतु मन उदास राहील. मनासारखे यश प्राप्त होण्याची शक्यता कमी आहे. पुढे जाण्यासाठी मदत करणारे लोक मागे सरकतील. आजार वाढण्याची शक्यता आहे.
या राशीच्या लोकानी   ॐ केशवाय नम :  या मंत्राचा जप करावा.
कन्या -
राहू आणि चंद्राचे गोचर या राशीमध्ये ग्रहण योग तयार करत आहे. अत्यंत सावध राहण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक काम सावधपणे करा. वादाची स्थिती निर्माण झाल्यास तेथून जाणेच फायद्याचे ठरेल. वाहन चालवताना काळजी घ्या तसेच गुंतवणुकीपासून दूर राहा.
या राशीच्या लोकानी   ॐ श्री ह्री क्ली कुबेराय नम :  या मंत्राचा जप करावा.
तूळ -
बाराव्या राशीतील चंद्रग्रहण सांभाळून राहण्याचा संकेत देत आहे. उत्पन्नात कमी आणि चिंतेमध्ये वृद्धी होऊ शकते. कार्यक्षमता कमजोर होऊ शकते. नातेवाईकांशी वाद आणि विरोधक प्रभावी होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अपमान होण्याची शक्यता आहे.
या राशीच्या लोकानी   ॐ ह्री पद्मे स्वाहा :  या मंत्राचा जप करावा.
वृश्चिक -
अकराव्या राशीतील चंद्रग्रहण शुभफळ देणारे राहील. शुभ वार्ता आणि उत्पन्न वृद्धीचे संकेत आहेत. कार्यप्रणालीमध्ये सुधार होईल. संपत्तीमधून लाभ तसेच अपूर्ण कार्य पूर्ण होईल. विरोधक परास्त होतील. आरोग्य उत्तम राहील.
या राशीच्या लोकानी   ॐ भद्र गणेशाय नम :  या मंत्राचा जप करावा.
धनु -
दहाव्या राशीतील चंद्रग्रहण या राशीच्या लोकांना सामान्य फळ देणारे राहील. उत्पन्न सामान्य राहील आणि चिंतांमधून मुक्ती मिळेल. एखादी नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते. अधिकारी प्रसन्न राहतील, परंतु काम जास्त करावे लागेल. विरोधकांना पराभूत करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतील.
या राशीच्या लोकानी    ॐ द्रांम दत्तात्रेयाय नम :  या मंत्राचा जप करावा.
मकर -
या राशीपासून नवव्या राशीमध्ये होणार्‍या चंद्र ग्रहणाचा प्रभाव या राशीच्या लोकांवर राहील. न्यायालयीन आणि वादग्रस्त प्रकरणांमध्ये स्वतःचा पक्ष ठेवण्यासाठी वेळ मिळेल. नोकरीत बदल होऊ शकतो. जबाबदारी वाढू शकते तसेच कुटुंबियांची मदत मिळेल.
या राशीच्या लोकानी    ॐ प्रां,प्रीं,प्रौ शं शनैश्चराय नम:  या मंत्राचा जप करावा.
कुंभ -
आठव्या राशीतील चंद्रग्रहण अशुभ फळाचे सूचक आहे. आजार वाढण्याची शक्यता आहे. मुलांकडून दुःख प्राप्त होण्याचे योग जुळून येत आहेत. नोकरीत चिंता वाढवणारी बातमी समजू शकते. हा कला शांत राहण्याचा आहे. कोणाशीही वाद घालू नये तसेच कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
या राशीच्या लोकानी  ॐ कार्तविर्याय नम :  या मंत्राचा जप करावा.
मीन -
सातव्या राशीतील चंद्रग्रहण सामान्य फळ देणारे राहील. नवीन काम करण्याची संधी मिळेल आणि कार्यशैलीत सुधार होईल. धनाची कमतरता जाणवेल. कुटुंबियांची मदत मिळेल. प्रत्येक काम विचारपूर्वक आणि योग्य मार्गदर्शनाने केल्यास यश प्राप्त होईल.
या राशीच्या लोकानी  ॐ दुर्गायै नम :  या मंत्राचा जप करावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा